"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

1.  गावाविषयीमाहिती : आपटाळे हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ९९% आदिवासी लोकवस्ती असलेले प्रगतिशाली  गाव आहे.आपटाळे पैकी गावठाण येथे प्रसिद्ध गावदेवीमंदिर आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २५५९ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 6, अंगणवाडी केंद्रे 8 ,मंगलकार्यालय  2 व व्यायामशाळा १,सभामंडप-२ आणि बहुउद्देशीय केंद्र -१ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ०3 समाजमंदिरे, सामुदायिक सभागृह ०1, केंद्रीय बहुद्देशीय केंद्र आपटाळे जन मन हॉल 1. पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

2. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून,भात,नागली ,उडीद तूर व  वरई  ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा पेरू या फळपिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते

3. आपटाळे  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपटाळे गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त  आहे.

4. ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व ० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

5. आपटाळे गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

2. भौगोलिकस्थान

आपटाळे  हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ५३८ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ८६८ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३३०८ आहे. त्यामध्ये १४९३ पुरुष  १८१५ महिला यांचा समावेश होतो.ग्रामपंचायत आपटाळे  हद्दीत  महसुली गावे व 3 पाडे आहेत.सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून 15 km अंतरापर्यंत वसलेले आहेत.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच आपटाळे गावालगत अवघ्या 3 किमी अंतरावर आपटाळे  गावाला  काळमांडवी पर्यटन स्थळ (धबधबा )आहे .काळशेती धरणातून पाणीपुरवठा गंगापूर ,चंद्रपूर गावाला होतो  . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः °से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात 15°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी 15० ते 200 से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

आपटाळे क्षेत्रातील मिरची,काजू,आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

3. लोकजीवन

विनवळ गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून मिरची,काजू,आंबा, व हंगामी भात,नागली,वरई पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

विनवळच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


886
3308
1493
1815

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo